23
परमेश्वर माझा मेंढपाळ 
दाविदाचे स्तोत्र. 
 1 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे* यहोवा-रोही, मला कशाचीही उणीव भासणार नाही. 
 2 तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो. 
 3 तो माझा जीव ताजा-तवाना करतो, 
तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो. 
 4 मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, 
मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, 
कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात. 
 5 तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस, 
तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे. 
माझा प्याला भरुन वाहत आहे. 
 6 खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील, 
आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.